कर्नाटकात शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षक भरतीवेळी मराठी माध्यमाला जास्तीत जास्त मराठी शिक्षक भरती करून अग्रस्थान द्यावे या मागणीसाठी सोमवार (ता. 21) रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.
तरी यावेळी खानापूर व बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिक व शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे