No menu items!
Tuesday, December 3, 2024

नगरसेवकाने केला रस्ता दुरुस्त

Must read

बेळगाव शहरातील मराठी नगरसेवक रवि साळुंखे हे सध्या आपल्या वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या जोरावर लोकप्रिय ठरत आहेत. वार्डातील विविध समस्या सोडविणे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि इतर नियोजनाच्या बाबतीत त्यांनी आघाडी घेतली आहे.
नुकताच त्यांनी एक रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल अँड टी या कंपनीने वॉर्ड क्रमांक 27 मध्ये येणार्‍या बसवेश्वर सर्कल येथे एक खड्डा खोदला होता. गेले कित्येक महिने हा खड्डा तसाच होता. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड होऊन बसले होते. अशा वेळी नागरिकांनी नगरसेवक रवी साळुंखे यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी हा रस्ता दुरुस्त करून घेतला आहे. अनेक महिन्यापासून काढण्यात आलेला खड्डा बुजवण्यात आला असून त्यावर डांबर घालून दुरुस्ती करण्यात आली आहे. जनतेचे काम सर्वात महत्वाचे आहे. या भावनेतून काम केल्यामुळे रवी साळुंखे यांची लोकप्रियता वाढत आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!