बाची गावातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथील शाळेच्या आवारात पेव्हवर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्रतीन महिने उलटले तरी हे काम पूर्णत्वास नेण्यात कडे कानाडोळा केले असल्याचे पहावयास मिळत आहे.
परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीचे कण जेवणात जात असून आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
या बरोबरच अधून-मधून कोसळणार्या पावसाने परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे उद्भवू नये याकरिता आवश्यक उपाय योजना राबविण्याची गरज आहे.
तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे देखील येथील विकास कामाकडे दुर्लक्ष झालेले असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून मुलांमध्ये एखादे लक्षणे आढळल्यास अथवा अर्धवट विकास कामांमुळे काही झाल्यास याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असा इशारा देण्यात आला आहे.