कपिलेश्वर रोड शौर्य या संघाने मंगाईदेवी ट्रॉफी वीस-बावीस पटकाविली आहे. तर द्वितीय क्रमांक पिरणवाडीच्या सनसेट वॉरियर्स या संघाने मिळविला आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून वडगाव मंगाई देवी परिसरामध्ये श्री मंगाई ट्रॉफी या नावाने हाफ पीच क्रिकेट स्पर्धा भरविली जात आहे. यावर्षीही अशाच पद्धतीने ही स्पर्धा उत्साहात पार पडली आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अभिषेक कलघटगी, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर ,समाजसेविका माधुरी जाधव, नगरसेविका दीपाली टोपगी ,जयश्री कलघटगी, उमेश कुडाळकर,मारुती कुंडेकर, अमित कित्तूर, प्रसाद घाडी, सुनील सुतार ,अनिकेत भोसले,सतीश धामणेकर, सिद्धार्थ धोंगडी, विश्वनाथ पाटील, हनुमंत पाटील, शंकर सोनटक्की , सुरज पाटील, शशी रजपुत, तुषार किल्लेदार ,प्रथमेश धामणेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अभिषेक कलघटगी व महेश जुवेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व यानंतर समाजसेविका माधुरी जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची मैदानात गर्दी झाली होती.
शौर्य स्पोर्ट्स व सन सेट वॉरियर्स यांच्यात अंतिम सामना सुरू होण्या आधी मैदानामध्ये प्रमुख पाहुण्यांना खेळाडूंची ओळख करून देण्यात आली यानंतर टॉस उडविण्यात आला. यावेळी अभिषेक कलघटगी यांनी विचार मांडताना सांगितले की दोन्ही संघाने उत्तम खेळबाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यासाठी अशाच पद्धतीने संपूर्ण जगभरात वडगाव संघाचे नावलौकिक व्हावे असे ते म्हणाले .
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघ आला रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मॅन ऑफ द सिरीज पटकावलेले सद्दाम कट्टी यांचा सत्कार करण्यात आला. फायनल मेन ऑफ द मॅच अजहर अश्रीफ तर बेस्ट बॉलर सोमनाथ इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यश चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हार व जीत याबद्दल आपले विचार मांडले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले श्री मंगाई स्पोर्ट्स च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन क्रिकेट स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडल्याकरिता सर्वांचे कौतुक करण्यात आले.