महाराष्ट्र रत्नागिरी जवळील देवरान युवा गेम्स 2022 मध्ये बेळगावच्या स्विमर्स क्लबचा जलतरणपटू अनिश पै उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांने या आयोजित केलेल्या स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत.
सदर स्पर्धा 19 आणि 20 मार्च रोजी रत्नागिरी मध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांने दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकाविले आहे. त्याने 200 मीटर वैयक्तिक मॅडेल मध्ये रौप्यपदक 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्यपदक तर 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये कांस्य पदक पटकाविले आहे.
अनिश हा स्विमर्स क्लब बेळगावचा जलतरणपटू असून त्याला अजिंक्य मेंडके अक्षय शेरेगार नितीन कुडूचकर गोवर्धन काकतकर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागते आहे. तसेच चिमुकल्या अनिश च्या वाटचालीकरिता अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.