दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्यासंदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते.
सुनील जाधव म्हणाले की, बेळगाव शहर परिसरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श रूप देण्याच्या उद्देशाने आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वेळेत सुरू करावी आणि वेळेत कसे संपवता येईल याचे आपण सर्वांनी काळजी घ्यावी तसेच कसल्याही प्रकारचा वाद विवाद होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. शिस्तबध्द वातावरणात शिवजयंती मिरवणूक झाली पाहिजे.
यतेश हेब्बाळकर यांनी मिरवणुकीत डीजे व पाश्यात्त्य पद्धतीच्या वाद्यांचा वापर न करता पारंपारिक शिवरायांच्या इतिहासातील सजीव देखावा सादर केला पाहिजे. जेणेकरून नव्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजेल. मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे खाजगी वाहनांना प्रवेश देऊ नये जेणेकरून मिरवणूक सुरळीत पार पाडले जाईल व याचा सर्वांना आनंद घेता येईल.
जे. बी. शाहपुरकर यांनी पिण्याच्या पाण्याची व अग्निशमन दलाच्या गाडीचे व्यवस्था करण्यात आली पाहिजेत तसेच रुग्णवाहिका सोयी सुविधा करण्यात यावी,
बेळगावच्या शिवजयंतीला अलौकिक परंपरा आहे. देशभर कुठेही सादर होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात बेळगावात शिवजयंती साजरी केली जाते. प्रत्येक चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांचअसतात त्यामुळे प्रत्येक चित्ररथाच्या सादरीकरण्यात सर्व सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. उत्सवाचे गांभीर्य राखत शिवप्रेमींनी पोशाख वर्तमानाचे भान राखावे, असे गुणवंत पाटील यांनी विचार मांडले. प्रसाद मोरे यांनी, मिरवणूक चित्ररथ मार्गासाठी परवाने आदी कामावेळी महामंडळ सहकार्य करेल. चित्ररथाची निर्मिती करतांना पूर्वनियोजिन करावे. जनरेटर दुरुस्ती करणाऱ्याची व्यवस्था करावी. शिवजयंती उत्सवाचे नियोजन सांगत भव्यदिव्य मिरवणुक काढण्याचा प्रस्ताव मांडला त्यास सर्व शिवजयंती उसत्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकमताने सहमती दिली. मेघन लंगरकांडे, यांनी मिरवणूक मार्गावरील जाहिरातीचे फलक व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा हटवाव्यात, मिरवणूक मार्गावर योग्य ठिकाणी प्रखर हॅलोजन दिव्यांची व्यवस्था करावी, धर्मवीर संभाजी चौकात प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करावी. मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करावी व शहरातील सर्व पुतळ्यांना रोषणाई करावी. राजू शेट्टी यांनी सर्व मंडळांनी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रतिमा चित्ररथावर लावावी असे सांगितले