महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या वतीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सूडबुद्धीने होणारी कारवाई थांबवावी त्याकरिता निवेदन सादर केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केले आहे.
दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी प्रसारमाध्यमातून शिवसेना नेते, राज्यसभा खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मालमत्ता प्रवर्तन निर्देशालाय (ed) या केंद्रीय तपास यंत्रणाने जप्त केली.
अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर स्वतः मा. राऊत साहेबांनी याला दुजोरा दिला. पण तपास यंत्रणाची कार्यवाही सूडबुद्धीने होत आहे त्यामुळे याचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राऊत साहेब आगेबढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यानी दिल्या याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यक्रते पदाधिकारी यांच्यासह अन्य नागरिक देखील उपस्थित होते