आंबेवाडी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच आता अधून मधून कोसळणार्या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
येथील रस्त्याचा विकास करण्याकरिता रस्ते खोदाई करण्यात आली मात्र काम पूर्ण करण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
तसेच एक रस्ता खाली आणि दुसरा रस्ता वर असल्याने गावकऱ्यांना या मार्गावरून जाताना अडथळा निर्माण होत असून काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.