मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर यांच्यावतीने येता शिवजयंती उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी उद्या दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता बॅ. नाथ पै चौक येथील श्रीसाईगणेश सोसायटीच्या सभागृहात बोलविण्यात आलेली आहे.
या बैठकीस शहापूर विभागातील शहापूर, होसुर, खासबाग, भारतनगर, वडगाव आदी विभागातील सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्यावतीने अध्यक्ष व माजी नगरसेवक नेताजी जाधव, कार्याध्यक्ष महादेव पाटील यांनी केले आहे.