कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण चौकशीसाठी उडपी येथील पोलिस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक तीन दिवसापूर्वी बेळगावात दाखल झाले आहे.
उडपी येथे संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याचा तपासाकरिता उडपी पोलिस हिंडलग्यात दाखल झाले असून ते ग्रामपंचायतीला भेट देऊन या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
आज त्यांनी हिंडलगा येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन मयत कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या बाबत चौकशी केली तसेच वर्कऑर्डर नसताना संतोष पाटील यांनी तब्बल चार कोटी रुपये खर्चाची 108 विकासकामे कशा प्रकारे केली याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला
तसेच पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेऊन त्यांचा ही जबाब देखील नोंदवून घेतला. त्याबरोबरच सदर पोलिसांनी काल दिवसभर हिंडलगा परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मयत संतोष पाटील यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेतली. तसेच ग्रामपंचायतीला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.