जिव्हाळा फाऊंडेशन आणि श्री अम्मा भगवान सेवा समिती यांच्या वतीने येथील मराठी प्राथमिक शाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीर रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांची नेत्र तपासणी, मधुमेह रक्तदाब यासह अनेक तपासणी केली.
यावेळी उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांनी कोणताही आजार झाल्यास भिऊन न जाता खंबीरपणे त्याला लढा दिला पाहिजे आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी डॉक्टर सविता कद्दू डॉक्टर सुरेखा पोटे डॉक्टर अनिल पोटे डॉक्टर नीता देशपांडे श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर चे डॉक्टर देवेगौडा आणि टीम शितल पौरवाल आणि टीम डेंटल डॉक्टर केएलई डेंटल डॉक्टर पाथ लाख हिमोग्लोबिन आणि लॅब टेक्निशियनचे कर्मचारी उपस्थित होते