गावात राहणाऱ्या प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण मिळावे तसेच त्यांना शहराप्रमाणेच सर्व सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता जीवन संघर्ष फौंडेशनचे संस्थापक डॉ गणपत पाटील यांच्यावतीने मदत करण्यात येत आहे .सदर अंगणवडीचे काम जांबोटी हबनहट्टी येथील आमटे गावात करण्यात येत आहे
या कामात त्यांना फेसबुक फ्रेंड सर्कलच्या संतोष दरेकर यांची देखील साथ लाभत आहे .त्यांनी येथील दुर्लक्षित झालेल्या अंगणवाडीची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेतले असून त्यांना याकामी सुळगा हिंडलगा येथील रहिवासी असलेले पेंटर यल्लप्पा पाटील, आणि पवन पाटील यांची साथ मिळाली आहे .
या कामगारांनी अवघ्या तीन दिवसात हिंडलगा सुळगा ते हबनहट्टी दररोज प्रवास करत अंगणवाडीच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण केले आहे .तसेच आशा नाडकर्णी आणि आशुतोष नाडकर्णी यांनी 25 प्लॅस्टिक खुर्च्या, 40 लाकडाच्या खुर्च्या, 3 टेबल, स्लाइडर आणि गोल व्हील दान केले आहेत.
याशिवाय डॉ रोहित जोशी, विनायक एल, श्रीनाथ देशपांडे यांनी अंगणवाडी रंगविण्यासाठी रंगरंगोटीची व्यवस्था केली. सुनील धोंगडी यांनी यापूर्वी खुर्च्या, टेबल आणि गेम सेट या सर्व साहित्य रंगविण्यासाठी ऑइल पेंटची व्यवस्था केली आहे.
मुलांना उत्तम शिक्षण मिळावे आणि चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता मदत देत आहेत .सध्या येथील अंगणवाडीच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
याप्रसंगी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष आर दरेकर , जीवन संघर्ष फाउंडेशनचे प्रमुख गणपत पाटील , अवधूत तुडयेकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते