बेळगाव :
७० वर्षांच्या आसपासच्या वृद्ध बेघर व्यक्तीला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत मिळाली आहे. पोलीस उपायुक्त श्री रवींद्र काशिनाथ गडादी आणि खडेबाजार पोलीस पथक आदींनी सामाजिक कार्यकर्त्यांना मदत केली.
फेसबुक फ्रेंड सर्कल चे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर यांना त्या व्यक्तीस निवारा गृहात स्थलांतरित करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले.
तात्काळ खडेबाजार पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून त्यांना श्री गणेश रोकडे यांच्या रुग्णवाहिकेतून खासबाग येथील बेघरांच्या शासकीय निवारागृहात हलवले गेले आहे. या उदात्त कार्यात मदत व सहकार्य केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानण्यात आले. संबंधित व्यक्तीचे सर्व कपडे ब्लँकेटसह अत्यंत घाणेरडे आणि फाटलेले असल्याने नवीन कपडे घेऊन देण्यात आले आहेत.याबद्दल या टीम चे विशेष कौतुक होत आहे.