रेड क्रॉस संस्था बेळगाव व संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव एकता दिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचविण्याकरिता हातभार लावला. यावेळी अध्यक्षस्थानी मारुती मोरे होते. तसेच व्यासपीठावर डॉक्टर डी एन मिसाळे कर्नल विनोदिनी शर्मा मुख्याध्यापक सतीश पाटील रेड क्रॉसचे पॅटर्न मेंबर डॉक्टर गणपत पाटील डॉक्टर बसवराज देवगी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व मास्कचे वितरण करण्यात आले. तसेच संकलित केलेले रक्त केएलई रक्तपेढी कडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी जवळपास 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी रेड क्रॉस चे पॅटर्न मेंबर डॉक्टर गणपत पाटील डॉक्टर डी एन मिसाळे, केएलई संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे , डॉक्टर करण खत्री डॉक्टर बसवराज देवगी, हुक्केरीचे उपायुक्त तहसीलदार श्री माळगे क्षेत्रीय संचालक मनोहर शहा यांच्यासह अन्य उपस्थित होते.