महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी वुमन सेफ कर्नाटकाचा नारा देत बाईक रॅली काढण्यात आली आहे. सदर बाईक रॅलीचे स्वागत आज बेळगावात जल्लोषात करण्यात आले
यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण च्या वतीने बाईक रॅली चे उत्साहात स्वागत करण्यात आले. सदर बाईक रॅली 3500 किलोमीटर अंतराची काढण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी तीस दिवसात 30 जिल्हे फिरून वूमन सेफ कर्नाटक असा नारा देण्यात येणार आहे. सदर बाईक रॅली बेंगलोर येथून काढण्यात आली आहे.
तसेच रोटरी क्लब ऑफ बेंगलोर मालगुडी आणि रोटरी क्लब ऑफ बेंगलोर सखीच्या महिला या बाईक रॅलीत सहभागी आहेत. सदर बाईक रॅली कोलार चिकबळ्ळापूर तुमकुर चित्रदुर्ग दावणगिरी हावेरी हुबळी धारवाड बेळगाव या मार्गे तीस दिवस 30 जिल्हे फिरणार आहे.