सध्या कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारने पुन्हा मास्कची सक्ती केलेली आहे.यासाठी वेदांत फौंडेशन व रेड क्रॉस संस्था मिळून उत्तम दर्जाचे जवळपास 1000/- मास्कचे वितरण करणार आहे .
वेदांत फौंडेशनमध्ये असणाऱ्या शिक्षकांच्या शाळेत प्रथम प्राधान्य दिले जाणार असून लवकरात लवकर आपल्या शाळेची नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे .
खालील शिक्षकांकडे आपण आपल्या शाळेचे नाव नोंदवू शकता .युवराज रत्नाकर सुनिल देसूरकर सविता चंदगडकर भाग्यश्री पाटील एन डी मादार
रेखा चौव्हान यांच्याकडे नोंद करावीत असे सतीश पाटील यांनी कळविले आहे .