दोन वर्षानंतर पार पडणाऱ्या शहरातील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोर्लिंगय्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी आज शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मिरवणूक उद्घाटनासाठी आमंत्रण दिले.
यावेळी शिवजयंती उत्सव तसेच चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर बोर्लिंगय्या यांच्याशी चर्चा केली.
तसेच त्यांना मिरवणुकीच्या पालखी पूजनाचे यजमानपद भूषविण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. तसेच यावेळी सार्वजनिक शिवजयंती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव मधील शिवजयंती चा इतिहास आयुक्तांना सांगितला. तसेच मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच याआधी कधी घडला नाही अशी माहिती यावेळी त्यांना दिली.
यावेळी पोलिस आयुक्तांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही या पद्धतीने लाऊड स्पीकर चा आवाज कमी ठेवण्यास सांगितले तसेच मिरवणूक विनाकारण तात्काळ ठेवू नये हुल्लडबाजीला थारा देऊ नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.