यंदाची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी याकरिता संपूर्ण मिरवणूकीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. मिरवणूक मार्गांवर नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी असल्याने पोलीस खात्याला सोयीस्कर व्हावे याकरिता ड्रोन कॅमेरा फिरविण्याची योजना आखण्यात आली आहे.
तसेच संपूर्ण मिरवणुकीवर प्रत्येक घडामोडींवर पोलीस खात्याची बारीक नजर असणार आहे. तसेच या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत.
रमजान,शिवजयंती, बसव जयंती सन एकत्रित आल्याने या सर्वांवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तसेच मिरवणूक काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
यंदाची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक दोन वर्षानंतर होत असल्याने नागरिकांनी ते शांततेत पार पडून सहकार्य करावे.तसेच कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेऊ नये जर असे झाल्यास त्याची गय केली जाणार नाही. असा कडक इशारा पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या यांनी दिला आहे.