बेळगाव शहरातील माळी गल्ली येथील युवक मंडळातर्फे आज सोमवारी छ. शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माळी गल्ली येथे आयोजित या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगरसेविका ज्योती राजू कडोलकर या उपस्थित होत्या.
नगरसेविका कडोलकर यांच्या हस्ते पूजा विधी करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा म्हंटला. जन्मोत्सव कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांचा मंडळातर्फे शाल -श्रीफळ आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अनुराधा चौगुले, कल्पना ठोकणेकर, युवा कार्यकर्ते मेघन लंगरकांडे, प्रभाकर बामणेकर, विकी ठोकणेकर, बसवराज नेसर्गी, रोहित लंगरकांडे आदींसह माळी गल्ली युवक मंडळाचे मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, शिवप्रेमी आणि गल्लीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.