हरे रामा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरेच्या जयघोष करीत आंतरराष्ट्रीय कृष्णभावा नामृत संघ इस्कॉन बेळगाव, आणि संकीर्तन युवक प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्या वतीने श्रीकृष्ण बलराम रथयात्रा महामहोत्सव रविवारी कल्लेहोळ येथे मोठय़ा उत्साहात रथयात्रा पार पडली.
कल्लेहोळ येथील संकीर्तन युवक प्रचार केंद्र यांच्या वतीने शनिवार दिनांक 7 मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजता संपूर्ण गावामध्ये नगर संकीर्तन संध्याकाळी ७:३० ते ८ वाजेपर्यंत स्लाईड-शो आणि रात्री ८ ते ९ पर्यंत प्रवचन रात्री ९ ते ९:३० पर्यंत नाट्यलिला आणि प्रसाद असा कार्यक्रम पार पडला.
रविवारी दुपारी २ वाजता श्रीकृष्ण बलराम रथ यात्रेला म. ए समितीचे युवा नेतृत्व आर एम चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि भगवत गीतेचे पुजन करुन रथयात्रेला गावच्या मुख्य बस स्टॉप पासुन सुरुवात करण्यात आली. रात्री लक्ष्मी मंदिर जवळ रथयात्रा पोहचली.
रथयात्रा संपूर्ण गावभर फिरविण्यात आली. यावेळी सर्व गावकरी महिला मंडळ युवक वर्ग मोठय़ा संख्येने रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण गावभर भगवा पताका आणि सुरेख रांगोळी काढण्यात आली होती.
प्रत्येकांच्या कपाळी अष्टगंध लावण्यात आले होते. मराठ मोळया वेशात महिलांनी पेहराव केला होता. संपुर्ण गाव हरे कृष्णा च्या जयघोषात दुमदुमुन गेले होते सर्व अबाल वरद नाचत होते रात्री ७ ते ८पर्यंत प्रवचन, Wरात्री ८ते ८:४५ नाटयलिला ८:४६ ते ९ आरती रात्री ९ वाजता महाप्रसादाने सांगता झाली.