दहावी परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक 12 मे रोजी जाहीर होणार आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली असून चांगले गुण मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला होता.त्यानंतर 23 एप्रिल पासून पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा निकाल लवकर लागावा आणि त्यांना महाविद्यालयात प्रवेश करण्यासवेळ मिळावा या हेतूने शिक्षण खात्याने निकाल लवकर लागावा यासाठी प्रयत्न हाती घेतले होते
त्यानुसार दहावीचा निकाल आता गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. दहावी ची परीक्षा 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान झाली होती. आता 12 मे रोजी काल जाहीर होणार आहे. तसेच शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेत स्थळास सह मोबाईल व इतर ठिकाणी निकाल विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऑनलाईन पाहता येणार आहे.