कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना आयोजित आंतरजिल्हा वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा वरिष्ठ संघाची निवड आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड चाचणी लव्हडेल सेंट्रल स्कूलच्या टर्फ फुटबॉल मैदानावर आज शुक्रवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी ४ वा. करण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील २० रजिस्टर क्लबच्या खेळाडूंमध्ये निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी सेंट्रल रजिस्टर सिस्टीम (सीआरएस) पद्धतीने घेतली जाणार आहे.याची नोंद सर्व रजिस्टर क्लबच्या पदाधिकायांनी व खेळाडूंनी घ्यावी.
निवडला जाणारा संघ कर्नाटक राज्य आंतरजिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून, संघटनेने आयोजित केलेल्या जिल्ह्यांकडे हा संघ रवाना होणार आहे. इच्छुक रजिस्टर फुटबॉलपटूंनी आपल्या किटसह आज दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ४ वा. लव्हडेल सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल मैदानावर उपस्थित राहावे , असे आवाहन बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमति पाटील यांनी केले आहे.