बेळगाव संरक्षण दलाच्या अखत्यारीत असलेली सुमारे 754 एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.
या प्रक्रिये विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बेळगाव येथील पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारनेही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.
याप्रकरणी गुरुवारी काही प्रमुख वकील व स्थानिक नागरिकांनी श्रीनगर येथील त्या जमिनीची पाहणी केली. आणि सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे.