शहरातील सांडपाणी वाहून नेणारा लेंडी नाला हिंद इंजिनीरिंग पासून अरुंद झाला होता.तसेच त्यामध्ये गाळही मोठ्या प्रमाणात साचला होता त्यामुळे शहरातील विविध भागांना पुराचा फटका बसत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे नाल्यात घाण साचून राहिल्याने पावसाचे पाणी पुढे जाण्यास व्यत्यय निर्माण होत होता. त्यामुळे पाण्याची साफसफाई करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आले आहे.
दरवर्षी शेतकरी संघटनेच्या वतीने नाल्यातून पावसाचे पाणी सुरळीत या जावे याकरिता आणि आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून गेल्या तीन वर्षांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे नाल्यात वाढलेली झाडेझुडपे काढून नाला पाणी वाहून जाण्यास रुंद करण्यात येत आहे.
नाल्यात कचरा साचून राहिल्याने नाल्यातील सर्व सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पिकाचेही नुकसान होत होते.त्यामुळे शेतकरी संघटनेने याची स्वच्छता करावी अशी मागणी वारंवार केली. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून या नाल्याची स्वच्छता करण्याचे काम सुरू झाले आहे.आता ही गुरुवारपासून या नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे.