रविवारी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात भव्य शामियाना उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
सदर कार्यक्रमाचे संयोजक किरण जाधव रमाकांत कोंडुसकर व इतर युवानेते असल्याने त्यांनी कार्यक्रमाच्या आधी पासूनच जय्यत तयारी हाती घेतली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरु वंदना कार्यक्रम हा 15 मे रोजी रविवारी वडगाव येथील आदर्श विद्या मंदिर च्या प्रांगणात साजरा होणार आहे.
या सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांत चार्य परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजीउपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी राहण्याकरिता शहर परिसरासह ग्रामीण भागातही ही जनजागृती केली जात आहे.
सदर कार्यक्रम आयोजकांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार पूर्वतयारीत आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी रित्या संपन्न होणार असून आज शुक्रवारपासून भव्य शामियाना उभारण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.