सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातलेल्या वळीवाच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. असे असले तरी येत्या काही दिवसात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
मान्सूनच्या आगमनाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. या पावसाचे आगमन म्हणजे मान्सून पूर्व सरींचा दणका असणार आहे.
सध्या अंदमान किनारपट्टीवर पावसाची हजेरी लागली आहे त्यामुळेच दक्षिण भारतात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मान्सून बरसण्यास सुरुवात होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळे शहर आणि तालुक्यात पावसाच्या सरींची शक्यता असून येत्या काही दिवसातच मान्सूनच्या पावसाला जोरदार आहे.