माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे विकेंद्रीकरण करण्यासाठी, सध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या 754 एकर जागेवर माहिती तंत्रज्ञान पार्क (IT पार्क) उभारण्याची राज्य सरकारची योजना आहे.आमदार अभय पाटील यांनी 754 एकर जागेत आयटी-पार्क उभारण्याची योजना आखली आहे जी आयटी कंपन्या स्थापन करण्यासाठी अतिशय योग्य आहे आणि शहराच्या हद्दीत सेमी कंडक्टर उद्योगाला काही स्थानिकांचा विरोध होत आहे .कारण त्यांना ऑक्सीजन करिता 754 एकर गवताळ भाग हवा आहे .मात्र स्थानिक नागरिक याला विरोध करत असून हे चुकीचे असल्याचे मत यावेळी दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी स्थानिकांच्या विरोधावर प्रतिक्रिया देताना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले, की “काही लोकांसाठी, मी जे काही करतो त्यात अडचण होत आहे.आदी त्याच ठिकाणी डिफेन्स क्वार्टर बांधणार होते.तेव्हा आंदोलक गप्प होते, मात्र आता ते आयटी पार्कला विरोध करत आहेत.
या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या आयटी पार्क मुळे जवळपास 1 लाख लोकांना थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत .सदर उद्योग आगामी पिढीसाठी उपयुक्त ठरेल असे मत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे ते म्हणाले “बेळगावमध्ये आयटी पार्कच्या विकासासह, शहराचा विकास महाराष्ट्रातील पुण्याच्या धर्तीवर होत आहे. अशा प्रकल्पांना विरोध केल्यास आपल्या येणाऱ्या पिढीवर परिणाम होईल. बेंगळुरू, मुंबई, पुणे सारख्या आयटी शहरांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यात काही समस्या आहे का? तेथे राहणारे लोक ऑक्सिजन सिलेंडरला जोडलेले आहेत का ? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे .पुणे बंगलोर मुंबई शहरात अनेक आयटी पार्क आणि कंपन्या नाहीत का? त्यामुळे विकास प्रकल्पांना विरोध करून उपयोग नाही, असे अभय पाटील यावेळी म्हणाले.