नवी दिल्ली रफी मार्ग येथे इन्स्टिट्यूशन ऑल क्लब ऑफ इंडिया येथे प्राऊन इंडियन पार्लिमेंट अवॉर्ड 2022 हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात असामान्य सामाजिक कार्य बद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर राजश्री तुडयेकर यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची डायरेक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात असामान्य सामाजिक कार्याबद्दल त्यांचा या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर राजश्री तुडयेकर या मूळच्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर च्या असून लग्नानंतर त्या बेळगावासिय झाल्या.
त्यांनी पुण्यातील चाळीस आदिवासी पारधी कुटुंबांना दत्तक घेतले आहे.तसेच त्यांना कुटुंबियांना जीवनाश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलला आहे. त्यानी लॉकडाऊनच्या काळात राबविण्यात आलेल्या अनेक समाजोपयोगी उपक्रम आणि मध्ये भाग घेतला होता तसेच कोणत्याही कार्यात अग्रेसर होत्या
त्यामुळे त्यांच्या या असामान्य सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे मंत्री रामदास आठवले चित्रपट अभिनेते शहाबाद खान गोल्डन लीडर अधिकार आणि सामाजिक न्याय खाजगी सचिव मनिश गवई यांच्यासह अन्य दिग्गज मान्यवर उपस्थित होते.