राज्यातील अनुसूचित जाती जमाती साठी असणारे आरक्षणाचे प्रमाण सध्या अवघे तीन टक्के इतकी आहे.त्यामुळे मागास असणारा हा जनसमुदाय सुविधांपासून वंचित राहिला आहे या आरक्षणाचे प्रमाण वाढवावे या मागणीसाठी दिनांक 20 मे रोजी राज्यभर महामार्गावर आंदोलन छेडण्यात येणार आहे.अशी माहिती विविध संघटना तसेच वाल्मिकी समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
यासंदर्भात बेंगलोर येथे मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आता अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. दिनांक 20 मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे प्रमुख राजशेखर तळवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.