भारताने उर्जेचे पर्यायी स्त्रोत निर्माण करण्याचा आणि कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार केल्यामुळे, देशभरात सौर पॅनेल आणि गीझरची मागणी वाढत आहे
तसेच दिल्ली, बेंगळुरू आणि पुणे सारख्या शहरांमध्ये सौर पॅनेल आणि गीझरची सर्वाधिक मागणी निर्माण होत आहे. तसेच बेळगाव देखील सौरपॅनेल आणि गिझरच्या मागणीत अव्वल स्थानावर आहे.
सौर गीझरसाठी टियर-1 शहरांमधून 45% मागणी बेंगळुरूने केली आहे. पुणे आणि हैदराबाद ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
हैदराबादमध्ये एप्रिल 22 मध्ये सर्वाधिक मागणी 43% वाढली. तर शहरांमध्ये नाशिक, म्हैसूर, कोल्हापूर, कोईम्बतूर आणि बेळगाव ही सर्वाधिक मागणी असलेले टॉप-5 यादीतील शहरे आहेत.