गेल्या दोन महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या बिल्डरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मूळचा हलगा येथील रहिवासी असणाऱ्या तसेच भवानी नगर येथे राहत असणाऱ्या राजू दोड्डबोम्मण्णवर वय 41 याचा 15 मार्च रोजी खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.या प्रकरणी त्याच्या पत्नीसह अन्य काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
बिल्डरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत त्यामुळे या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असणाऱ्या समाजसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त मिळाले आहे.
मात्र समाजसेवेच्या पडद्याआडून खुनाचे कारस्थान करणाऱ्या त्या कुतंत्री व्यवसायिकाची माहिती पोलिस यंत्रणेने अद्याप जाहीर केलेली नाही. याप्रकरणाचा मास्टर माईंड असणारा एक समाजसेवक सध्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे खुनाच्या घटनेनंतर या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल अशी माहिती पोलिस आयुक्त एम बी बोरलींगय्या यांनी दिली आहे