सांबरा येथील विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम रेडिओ सिग्नल वर आधारलेली यंत्रणा बसविण्यात येत आहे. ढगाळ किंवा खराब वातावरण असेल की विमाने उतरविताना अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी बेळगाव विमानतळावर या यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
येत्या काही दिवसात खराब वातावरण असून देखील विमान धावपट्टीवर उतरविणे एल आय एन एस ( इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) या यंत्रणेमुळे सोयीस्कर होणार आहे.तसेच त्याचे काम सध्या सुरू झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.