गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने राकस्कोप जलाशयाची पातळी एक इंचाने वाढली आहे. तसेच चंदगड तालुक्यात दोन दिवसात भरपूर पाऊस झाला असल्याने जलाशयात पाणी पातळी वाढली आहे .
मान्सूनपूर्व पावसाने राकस्कोप जलाशयाची पातळी सध्या वाढली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा महामंडळ आणि एल अँड टी कंपनी ची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.
जर येत्या काही दिवसात अशाच प्रकारे पाऊस पडत राहिला नंतर राकसकोप जलाशयातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात होईल आणि उन्हाळ्यात देखील पाणी टंचाई कमी होईल