राज्यात मान्सून पावसाची धास्ती सर्वाना लागली आहे .त्यामुळे कर्नाटकचे महसूल मंत्री आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी आर. अशोक यांनी खबरदारीचा उपाय म्हणून NDRF (केंद्रीय आपत्ती संरक्षण दल) च्या चार पथके पुढील आठवड्यात राज्यात येणार असल्याची माहिती दिली आहे .
चिकमंगळूर, दक्षिण कन्नड, उडुपी, कोडगु, शिवमोग्गा, दावणगेरे, हसन आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोबत आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली .यावेळी ते बैठकीचे अध्यक्षस्थानी होते .
यावेळी ते म्हणाले “प्रत्येक जिल्ह्यात, आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक उपकरणांसह एक वाहन तयार ठेवावे. त्यांचा उपयोग रस्त्यांवर पडलेली झाडे काढण्यासाठी किंवा पूर किंवा भूस्खलनाच्या वेळी लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी केला जावा”, अशी सूचना केली .
यावेळी त्यांनी असे सांगितले की दक्षिण कन्नड, कोडगू, बेळगाव आणि रायचूर येथे एनडीआरएफच्या चार पथके तैनात असतील. एक वेगळी टीम बेंगळुरूमधील परिस्थितीवर लक्ष ठेवेल NDRF च्या चार पथकांपैकी एक दक्षिण कन्नड येथे तैनात असेल आणि ते उडुपी, उत्तरा कन्नड जिल्हे आणि आसपासच्या भागांची पाहणी करून काळजी घेतील.आणखी एक टीम कोडागु येथे तैनात असेल आणि म्हैसूर, हसन आणि चिक्कमंगळुर जिल्ह्यांचा परिस्थितीवर नजर ठेवेल.
तसेच बेळगाव येथे तैनात असलेले तिसरे पथक बागलकोट, विजयपुर आणि आसपासच्या परिसराची काळजी घेतील
चौथी टीम रायचूर, यादगिरी, बळ्ळारी , कलबुर्गी आणि आसपासच्या परिसराची काळजी घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली .