कुटुंबातील अंतर्गत वादामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने मायण्णा गल्ली कडोली येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कल्लाप्पा देसाई वय 68 असे प्रगतशील आणि सुप्रसिद्ध कडोलीतील शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात शेतकर्याच्या कुटुंबाला अंतर्गत वाद झाला यावेळी या वादाला कंटाळून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले.
यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सदर घटनेची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.