जुना गुडसशेड रोड, गोडसे कॉलनी बेळगाव येथील “वन टच फाऊंडेशन ..एक हात मदतीचा या नेहमीच अनेक वेगवेगळ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, सदस्य अशोक चौगुले, वृषाली मोरे, धनश्री पाटील, देवयानी पाटील, यांच्या वाढदिवसा निमित्तानं शहरातील, सदाशिवनगर , ज्योतीनगर ,कामत गल्ली, शहापूर, कंग्राळी (बी.के.) ऑटोनगर, या ठिकाणी जाऊन अतिशय गरजु गरीब अशा एकूण 20 कुटुंबांना एक महिना पुरेल इतके आहार धान्य, त्यामधे साखर, चहा पावडर, तेल पाकीट, चना डाळ, तूर डाळ, मूग, वाटाणे, तिखट पाकीट, हळद पाकीट, बेसन पीठ, इत्यादी साहित्य वाटप केले .
या सामाजिक कार्यात सेक्रेटरी मनोहर बुक्याळकर, सदस्य टी.डी.पाटील, ज्योतेश हुरूडे, जय प्रकाश बेळगावकर, संतोष पाटील, शटूप्पा पाटील ,रमेश सुतार, संतोष गंधवाले , माधुरी माळी, कल्पना सावगावकर, उपस्थित होते. यावेळी सर्व साहीत्य संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष. श्री.विठ्ठल फोंडू पाटील आणि अशोक चौगुले यांनी देऊ केल्याने त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.