येथील यंदे खुटावर कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच येथील कचरा उचलण्यात कडे कानाडोळा केला असल्याने येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या भागातील काही व्यवसायिक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपल्या हॉटेलमधील कचरा आणून या ठिकाणी टाकत असतात. ओला कचरा या ठिकाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना येथून ये-जा करताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
या ठिकाणी अनेक बस स्टँड रिक्षा स्टँड आहेत त्यामुळे प्रवाशांची या मार्गावरून नेहमी वर्दळ असते. तसेच शाळा आणि कॉलेज देखील याच भागात असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळते.
यासोबतच येथे सिग्नल यंत्रणा देखील असल्याने वाहनधारक देखील सिग्नल वर थांबलेले असतात त्याच्याच बाजूला हा कचरा साठला असल्याने त्यांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
येथील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचऱ्याचा ढीग साचलेला पाहायला मिळत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून येथील कचऱ्याची लवकरात लवकर उचल करण्यात यावी अशी मागणी होत आहे.