बेडकिहाळ
शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श पत्रकार व समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जणांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सदर कार्यक्रम बेडकिहाळच्या रत्नाप्पांना कुंभार सभागृह मध्ये पार पडला .यावेळी प्रथम महात्मा गांधींजींच्या फोटो प्रतिचे पुजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सुमित्रा भोसले यांनी केले.त्यानंतर कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट व श्रमिक पत्रकार संघ, सदलगा तसेच सिमाभाग पत्रकार संघ बेडकिहाळ यांच्या वतीने समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जणांना व आदर्श पत्रकार अशा व्यक्तींना प्रेरणा मिळण्यासाठी डॉक्टर, शिक्षक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तींना शाल, पेन, फुल देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.सदर कार्यक्रम लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बी.एस.पदवीपुर्व महाविद्यालयाच्या देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृह मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते हे समाजासाठी अहोरात्र कार्य करुन समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करत असतात. तसेच पत्रकारिता मध्ये पत्रकार सुध्दा समाजाचा चौथा अंग म्हणुन पाहिले जाते . कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजामध्ये घडलेल्या घटना पोहचविण्याचे काम ते करत असतात. म्हणुन त्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे. असल्याचे मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले .यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा सौ.विद्या देसाई, उपाध्यक्षा जयश्री जाधव, पंचायत सदस्य बेडकिहाळ प्रमोद पाटील, आयुर्वेदिक औषध कंपनीचे संस्थापक इचलकरंजी बाळासाहेब पाटील, पत्रकार संघ अध्यक्ष बेळगाव श्रीकांत काकतीकर, समाज कल्याण अधिकारी चिकोडी जीवन पम्मार, दलित संघर्ष समिती अध्यक्ष घटप्रभा श्रीकांत तळवार, सामाजिक कार्यकर्ते ईचलकरंजी निवास कांबळे, उधोजक प्रकाश काकतीकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी उल्लेखनीय कार्य करुन विविध पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या विविध क्षेत्रातील 30 पुरस्कारकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बेडकिहाळ व परिसरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवरत्न गणेश मंडळ बेडकिहाळ सर्व सदस्य, बेडकिहाळ ग्राम पंचायत सर्व सदस्य सदस्या, तसेच गळतगा,भोज,नेज,एक्संबा, इचलकरंजी,बारवाड,कारदगा, सदलगा येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती हट्टीमणी यांनी केले. आभार अजित कांबळे यांनी मानले.