जागतिक पर्यावरण दिवसाचे महत्त्व जाणून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंडोळी गावातील डोंगरांमध्ये वसलेले या स्वयंभू बसवाण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी जायन्ट्स चे शिवकुमार हिरेमठ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडोळी गावातील पंचायत अध्यक्ष लक्ष्मीकांत कणबरकर व वार्ड क्रमांक 54 चे नगरसेवक सारंग नागोजी उपस्थित होते.
वारंवार जंगल तोडीने निसर्गाचे समतोल बिघडत चालले आहे निसर्गाशी माणसाने असलेले पूर्वापार संबंध बिघडत चालले आहेत. समाजात सजीव प्राण्यांचे जगणे सुंदर आणि समृद्ध व्हायचे असेल तर प्रत्येकाने पर्यावरणाला महत्त्व दिले पाहिजे आपल्या घरासमोर एक तरी झाड लावून त्याचे संरक्षण केले पाहिजे. हा राष्ट्रीय कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून होत आहे याचा अभिमान आम्हास आहे असे प्रतिपादन अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे सारंग नाव कोचे यांनी 5 जून ला वृक्षारोपणाचा कार्यक्रम का घेतात व त्याचे महत्त्व सांगितले संचालक सुरेश यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ होते. याप्रसंगी जायंट्स चे उपाध्यक्ष सुनील मुंगेकर अविनाश पाटील संचालक विश्वास पवार पांडुरंग पालेकर आनंद कुलकर्णी धीरज मरळी हल्ली पद्म प्रसाद हुली आदींसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.