कोनवाळ गल्ली येथील पाणी समस्या अद्यापही डोके वर काढत आहे. येथील पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे.
येथील नळाला ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे उलटी जुलाब यासारख्या आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
प्रशासनाला कळवून देखील त्यांनी या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. वारंवार निवेदने आणि तक्रार देऊन देखील कोनवाळ गल्ली येथील पाण्याची समस्या सोडविण्याकडे कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच येथील पाण्याला ड्रेनेज चा वास येत आहे. तसेच हे पाणी पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी अयोग्य असल्याने नागरिकांना टँकर आणि बिसलरी बाटल्या विकत घ्याव्या लागत आहे
ही समस्या गेल्या काही वर्षांपासून अशीच असून येथील समस्या केव्हा मार्गी लागणार या प्रतीक्षेत बसले आहेत. तेव्हा येथील नागरिकांची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.