सतीश जारकीहोळी फाउंडेशनने यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत रँकिंग मिळविलेल्या गरजू विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.
दहावीच्या परीक्षेत रँकिंग मिळविलेल्या गरजू विद्यार्थ्यांचा आमदार सतीश जारकीहोळी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.
तसेच कॉलेज प्रवेशासाठी आपल्या फाउंडेशनतर्फे आवश्यक मदत देऊ केली आहे. याबद्दल सतीश जारकीहोळी फौंडेशनला संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आशीर्वाद दिला असून फाऊंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.