हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील
मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या
एप्रिल 2022 च्या दहावी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्ल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुवार दि. 9 जून रोजी दुपारी 2-00 वाजता येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला हिंडलगा गावचे सुपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ.दिनकर म. साळुंखे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.तरी हिंडलगा कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी यात्रोत्सव संघाचे सेक्रेटरीप्रकाश बेळगुंदकर मोबाइल नंबर 9449027606 किंवा खजिनदार उदय नाईक नं. 9591930057वर दि . 9 जून रोजी नांव नोंदणी करावी असे संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांनी आवाहन केले आहे.