उद्यमबाग येथील जीआयटी महाविद्यालयात आज आणि उद्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात नाट्य नृत्य संगीत यासह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. आज बुधवार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी सहा वाजता श्याम शानदार हा कार्यक्रम होणार असून नृत्य नाटक व संगीताचा कार्यक्रम देखील होणार आहे. तसेच उद्या गुरुवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजता फॅशन शो डीजे परफॉर्मन्स कार्यक्रम होणार आहे.