स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांचा फटका नागरिकांबरोबरच आता जनावरांनाही बसू लागला आहे. अर्धवट केलेला विकास कामांमुळे नागरिकांबरोबरच आता जनावरेही अडकून पडत आहेत.
आज सकाळी येथील क्लब रोड वरील गटारीचे बांधकाम अर्धवट राहिल्याने यात एक म्हैस अडकून पडली. येथील गटारी वरील एका ठिकाणी स्लॅप न घालण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला.
यावेळी म्हशीचा पाठीचाच भाग दिसत होता. तसेच म्हशीचे तोंड गटारी च्या आत गेले होते. यावेळी येथून ये-जा करणार्या नागरिकांना ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळविली.
त्यानंतर आज दुपारी बाराच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने म्हशीला बाहेर काढण्यात आले . म्हैस ज्या गटारीत पडली होती तेथे एका बाजूने लोखंडी बार बाहेर निघाले होते.
मात्र सुदैवाने ते म्हशीच्या पोटात न गेल्याने म्हैस बाल बाल बचावली आहे. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा शहरात घडू नये याकरिता अर्धवट राहिलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे बनले आहे.
तसेच रात्री अंधारात सदर म्हैस पडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे