महिला विद्यालय इंग्लिश मीडियम शाळा आणि वेदांत फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक अकरा रोजी महिला विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता आयएएस अधिकारी साहित्या मल्लिकार्जुन अलडकट्टी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम कॉलेज रोडवरील महिला विद्यालय इंग्लिश मिडीयम च्या सभागृहात पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ डी एन मिसाळे असणार आहेत. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.