देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, मास्क न घातलेल्या प्रवाशांना एअरलाइनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश जारी करण्यात आला आहे.
कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पद्धतींचा अवलंब केला आहे.
परदेशातून येणाऱ्या लोकांकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपन्यांना “नो मास्क, नो एंट्री” असा कडक इशारा दिला आहे.
नो मास्क नो एंट्री फ्लाइटमध्ये विमानतळांवर आणि विमानांमध्ये काही बेजबाबदार प्रवासी मास्क घालण्यास नकार देत आहेत. त्यामुळे DgCA ने विमान कंपन्यांना मास्क न घातलेल्या प्रवाशांना विमान उड्डाण करण्यापूर्वी खाली उतरवण्याचे निर्देश दिले आहेत.