महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला समिती सदस्य श्री राम आपटे, श्री राजाभाऊ पाटील, श्री दिनेश औलकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव सुजाता सौनिक, श्री शिवाजीराव जाधव, श्री संतोष कह्यक उपस्थित होते.
यावेळी बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच पुढील बैठक 8 जुलै रोजी होणार असल्याचे देखील कळविण्यात आले आहे. .बैठकीपूर्वी सर्व साक्षीदारांची ओळखपत्रे निश्चित केली जातील. दोन ज्येष्ठ वकिलांची लवकरात लवकर नियुक्ती करून मुख्यमंत्री व ज्येष्ठ वकील श्री.हरीश साळवे यांच्याशी चर्चा केली असे बैठकीत सांगण्यात आले .
तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी नकाशा तयार करण्याचे कामही महिनाभरात पूर्ण केले जाणार आहे. तज्ज्ञ समितीची पुढील बैठक दिल्लीत होणार आहे अशी माहिती देण्यात आली .या बैठकीला आमदार श्री रोहित पवार हे देखील आवर्जून उपस्थित होते.