सोमवार दिनांक 13 जून रोजी भाजपचे शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.त्यामुळे उद्या संध्याकाळपासूनच प्रचारावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
तसेच उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना कोणत्याही जाहीर सभा तसेच जाहीर प्रचार करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मात्र या काळात केवळ पाच जणांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन उमेदवारांना प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय मतदारांना कोणतेही आम्ही दाखवू नये त्यांच्यावर दबाव किंवा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे सांगितले असून सार्वजनिक प्रचारावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातल्यास देखील सांगितले आहे.
त्यामुळे 48 तास आधीच निवडणुकीच्या प्रचारावर निर्बंध घातले असल्याने उद्या दुपारपर्यंत उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना प्रचार करता येणार आहे .