डॉ नीता देशपांडे यांच्या डायबेटिक सेंटर मध्ये उद्या सायंकाळी सहा वाजता संध्या किरण सेवा केंद्राचा ज्ञान मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
टिळकवाडी सोमवार पेठ येथील सोसायटीच्या कार्यालयात सदर कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आला आहे. उद्या शनिवार दिनांक 11 जून रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत सदर कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमाला सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष डी पी शिंदे यांनी केले आहे