कल्लेहोल गावांमध्ये विविध प्रकारचे शासकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणे राबविण्यात येतात यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ,ग्रामसभा वार्ड सभा, सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती, किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन,कोरोना रोग व सर्व प्रकारचे लसीकरण,लहान मुलांचे लसीकरण, युवा महोत्सव, योगा वर्ग,स्त्री सबलीकरण कार्यक्रम, शेतकऱ्यांना शेतीविषयक आणि शेतीपूरक उद्योगधंद्यांचे मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिरे, गेम्स, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन,व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम गावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणे घेण्यात येतात परंतु हे सर्व कार्यक्रम गल्लीमध्ये उघडा रानावर, एखाद्या आडोशाला उभा राहून पावसामध्ये थंडीमध्ये वाऱ्यामध्ये उभे राहून घेण्यात येतात परिणामी या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती अतिशय अल्प प्रमाणात लागते आणि शासनाच्या कार्यक्रमाची जनजागृती योग्य प्रकारे होत नाही व हवी आहे ती फलनिष्पत्ती प्राप्त होऊ शकत नाही. आजचा तरुण पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जात आहे आणि त्यांना यापासून वाचवायचे असल्यास योग्य प्रकारच्या व्यायाम शाळा आणि तशा सुविधाही त्यांना उपलब्ध करून देऊन मार्गदर्शनही केले पाहिजेत
या सर्व गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर गावामध्ये भव्य असे सामुदायिक भवन त्यासमोर छोटीशी बाग आणि पार्किंगची व्यवस्था असलेली एक इमारत निर्माण व्हावी अशा आशयाचे जवळपास सहाशे लोकांच्या सह्यांचे निवेदन कल्लेहोल ग्रामस्थांच्या मार्फत सुळगा ग्रामपंचायत पी.डी.ओ. यांना देण्यात आले. याप्रसंगी निवेदन देताना ग्राम पंचायत सदस्य, गावातील संकीर्तन युवक मंडळ महिला आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.